MNS on Pathaan : 'पठाण'ने घेतला मराठी चित्रपटांचा बळी?; मनसेने दिला इशारा

'पठाण' चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला असून मराठी चित्रपटांना यामुळे कमी स्क्रीन्स दिल्याचेही समोर आले आहे
MNS on Pathaan : 'पठाण'ने घेतला मराठी चित्रपटांचा बळी?; मनसेने दिला इशारा

आज वादग्रस्त आणि बहुचर्चित 'पठाण' हा चित्रपट देशभरासह राज्यातही सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र, अनेक ठिकाणी चांगले चालत असलेले 'वेड', वाळवी' सारखे मराठी चित्रपट तसेच, आज प्रदर्शित होणारे ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये अत्यंत कमी शो देण्यात आले आहेत. यामुळे मराठी चित्रपट रसिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून आता याची दखल मनसेनेदेखील घेतली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यावर टीका करत म्हंटले आहे की, "मल्टीप्लेक्स चालकांनी समंजसपणे वागावं, नाहीतर मग आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो," असा इशारा दिला आहे.

मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, "आज 'पठाण' हा चित्रपट बॉलिवूडसाठी मोठी घटना वगैरे आहे. पण शाहरुख खानचा कमबॅक आहे, म्हणून मल्टीप्लेक्सनी ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या चित्रपटांचा बळी का द्यावा?" असा सवाल त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, "पठाणचं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायलाच हवा. मल्टीप्लेक्स चालकांनी समंजसपणे वागावे, नाहीतर मग आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो," असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in