मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्षावर गणरायाच्या दर्शनाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे कुटुंबियांचे स्वागत केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्षावर गणरायाच्या दर्शनाला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे हे देखील होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिंदेगट तसेच भाजप एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यास महत्व आले आहे.

मंगळवारी संध्याकाळी राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे यांनी वर्षा येथील गणरायाचे दर्शन घेतले. राज ठाकरे सुमारे अर्धा तास तिथे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे कुटुंबियांचे स्वागत केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाउन गणरायाचे दर्शन घेतले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसे अशा युतीच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक तसेच शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्तावावेळी मनसेने शिंदे गट तसेच भाजपाचे समर्थन केले होते. आता महापालिका निवडणुकीत देखील ही साथ कायम राहणार का हा प्रश्न औत्सुक्याने चर्चिला जात आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला अस्मान दाखवायचेच असा चंग भाजपाने बांधला आहे. मनसे सोबत आल्यास मुंबईत भाजपाला फायदा होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in