Mumbai : नाल्यातील गाळ नाल्यातच! मनसेने फोटो दाखवत केली पोलखोल

शंभर टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले पालिकेचा हा दावा फोल आहे. मुंबई शहर व उपनगरातील अनेक नाल्यांतील गाळ नाल्यातच असून कचरा प्लास्टिक आदी वस्तूंनी नाले तुडुंब भरल्याचे फोटो झळकवत मनसेचे पालिकेतील गटनेते यशवंत किल्लेदार यांनी पालिकेच्या दाव्याची पोलखोल केली. मुंबईची तुंबई होऊ द्यायची नसेल तर नालेसफाई गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले.
नाल्यातील गाळ नाल्यातच! मनसेने फोटो दाखवत केली पोलखोल
नाल्यातील गाळ नाल्यातच! मनसेने फोटो दाखवत केली पोलखोल
Published on

मुंबई : शंभर टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले पालिकेचा हा दावा फोल आहे. मुंबई शहर व उपनगरातील अनेक नाल्यांतील गाळ नाल्यातच असून कचरा प्लास्टिक आदी वस्तूंनी नाले तुडुंब भरल्याचे फोटो झळकवत मनसेचे पालिकेतील गटनेते यशवंत किल्लेदार यांनी पालिकेच्या दाव्याची पोलखोल केली. मुंबईची तुंबई होऊ द्यायची नसेल तर नालेसफाई गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले.

मुंबईतील वडाळा, धारावी, भारतनगर, नाहूर गोवंडी, कुर्ला, पंचशीलनगर, अशोकनगर, क्रांतीनगर-कुर्ला वाकोला, मानखुर्द, चेंबूर, केशवपाडा नाला आदीं नाले गाळणी भरले असल्याचे फोटो बॅनरच्या माध्यमातून किल्लेदार यांनी दाखवले.

नाल्यातील गाळ नाल्यातच! मनसेने फोटो दाखवत केली पोलखोल
नाल्यातील गाळ नाल्यातच! मनसेने फोटो दाखवत केली पोलखोल

ज्या दिवशी सत्ताधारी नाले पाहणीसाठी जातात त्या आधी पालिका अधिकारी ठेकेदारांना सूचित करतात मग ते सर्व मशिनरी लावून तात्पुरता गाळ काढल्याचे दाखवतात आम्ही सातत्याने पालिकेत या प्रश्नावर आवाज उठवायला जातो; मात्र, आम्हाला बोलू दिले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सध्या पाणीटंचाई असल्याने पालिकेकडून १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. कपात करणे हे ठीक आहे, मात्र; पाण्याचा प्रेशर कमी का केला जातो. त्यामुळे इतर नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पाणी प्रकल्पवर प्रशासन एवढा खर्च करत आहे, मग जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाण्याच्या पाईपलाइन आहेत त्यातून गळती कशी काय होते, असा सवाल किल्लेदार यांनी पालिका प्रशासनाला केला.

logo
marathi.freepressjournal.in