Mumbai : मोठी बातमी! मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी रॉड आणि स्टंपने मारहाण केली
Mumbai : मोठी बातमी! मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला
Published on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता हल्ला झाला. ही शिवाजी पार्क येथे घडली असून हल्ला करून हल्लेखोर तिथून पसार झाले. या हल्ल्यात संदीप देशपांडे किरकोळ जखमी झाले असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे संदीप देशपांडे हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. यावेळी काही हल्लेखोरांनी स्टम्प आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला चढवला. त्यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्याने दुखापत झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. त्यांनी तोंडावर मास्क घातला असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in