‘एमएसडब्ल्यू’ भरती प्रक्रियेवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा

पद भरतीसाठी असलेल्या नियमांमधील जाचक अटी निदर्शनास आल्या
‘एमएसडब्ल्यू’ भरती प्रक्रियेवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा
Published on

मुंबई : समाज विकास अधिकाऱ्यांच्या (एमएसडब्ल्यू) पदासाठी होणाऱ्या भरतीत परीक्षा न घेता, अधिकाऱ्यांची भरती होणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेसह सीडीओ असोसिएशनकडून विरोध सुरू झाला आहे. ही भरती तातडीने थांबवून सर्वात आधी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची निवड करावी, अन्यथा आयबीपीएस कंपनीकडून परीक्षा घेऊन त्यात पात्र असलेल्या व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संघटनांकडून तीव्र संताप नोंदवला जाईल, असे मनसे यूनियनकडून सांगण्यात आले

एमएसडब्ल्यूच्या २० टक्के कर्मचारी कोटा असलेल्या पद भरतीसाठी २०१८मध्ये ३२ जागा होत्या, त्यातील केवळ २२ जागा भरल्या गेल्या. तसेच त्यावेळी कोविड काळ असल्याने एमएसडब्ल्यूसाठीच्या या भरती प्रक्रियेसाठीच्या परिपत्रकातील जाचक अटींकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र २०२२-२३ साली सुरू असलेल्या या १० पदांच्या भरतीसाठी १३० अर्ज आले. त्यामुळे पद भरतीसाठी असलेल्या नियमांमधील जाचक अटी निदर्शनास आल्या.

चतुर्थ श्रेणींसाठी असलेल्या भरतीमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. मात्र या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये परीक्षा न घेताच पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महापालिकेतील भरती झालेल्या तारखेच्या निकषावर ही भरती करण्यात येणार आहे. मात्र या भरतीमध्ये एम एस डब्ल्यू साठी ची परीक्षा सर्वात आधी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना प्राधान्य द्यायला हवे अशी मागणी या कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे या मागणीमुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयबीपीएस कंपनीकडून परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले होते मात्र ही परीक्षा न घेताच सध्या भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इंजीनियरिंग सॅनिटरी इन्स्पेक्टर नर्सिंग यामध्ये पहिल्यांदा पदवी घेतलेल्यांना पहिल्यांदा सेवेत सामावून घेतले जाते एम एस डब्ल्यू साठी देखील अशा प्रकारे भरती करावी अशी मागणी मनसे शिवसेना आणि सीडीओ असोसिएशन कडून करण्यात आली. मात्र त्यावेळी अन्य 2 संघटनांनी या मागणीस विरोध दर्शवला त्यामुळे काही संघटनांच्या दबावाखाली येऊन महापालिकेचे अधिकारी निर्णय घेत नाही ना असा सवाल मनसे शिवसेना कर्मचारी युनियन कडून विचारला जात आहे

logo
marathi.freepressjournal.in