दीड वर्षांत रेल्वे प्रवासादरम्यान १० हजार प्रवाशांचे मोबाइल चोरीला

दोन हजार ६१८ मोबाइल परराज्यांतून हस्तगत करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली
दीड वर्षांत रेल्वे प्रवासादरम्यान १० हजार प्रवाशांचे मोबाइल चोरीला

रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे; मात्र दुसऱ्या बाजूला वाढत्या गर्दीचा फायदा घेत मुंबई उपनगरीय रेल्वे आणि मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील दीड वर्षांत रेल्वे प्रवासादरम्यान १० हजार १५९ प्रवाशांचे मोबाइल चोरीला गेले आहेत. यापैकी दोन हजार ६१८ मोबाइल परराज्यांतून हस्तगत करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत मोबाइलचोरीचे प्रमाण वाढले आहे. रुळांजवळील खांबाच्या मागे लपून लोकलच्या दरवाजात उभ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढायचे प्रकार मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मुंबई विभागात जानेवारी २०२१ पासून ऑगस्ट २०२२पर्यंत १० हजार १५० मोबाइलचोरीचे गुन्हे लोहमार्ग पोलिसांकडे नोंद झाले आहेत. यापैकी तीन हजार ७४३ गुन्ह्यांची उकल झाली असून, दोन हजार ६१८ मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यात आले आहेत. अनेक वेळा चोरलेले मोबाइल परराज्यात विकण्यात येत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in