समुद्रकिनारी आता मोबाईल टॉयलेट पर्यटकांची गैरसोय होणार दूर, समुद्र किनारे दुर्गंधीमुक्त दिव्याग, वृद्धांसाठी लोव्हर प्लॅटफॉर्मची सुविधा

दोन किलो वॅटचे सोलार पॅनल; पालिका साडेतीन कोटी रुपये खर्चणार
समुद्रकिनारी आता मोबाईल टॉयलेट पर्यटकांची गैरसोय होणार दूर, समुद्र किनारे दुर्गंधीमुक्त दिव्याग, वृद्धांसाठी लोव्हर प्लॅटफॉर्मची सुविधा

मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी आता मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. दिव्यांग, वृद्ध, गरोदर महिलांसाठी हे मोबाईल टॉयलेट लोव्हर प्लॅटफॉर्मचे असणार आहे. विशेष म्हणजे वीजेची बचत करण्यासाठी दोन किलो वॅटचे सोलार पॅनल बसवण्यात येणार असून, विविध समुद्र किनारी एकूण २४ मोबाईल टॉयलेट उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३ कोटी ४२ लाख रुपये खर्चणार आहे. पर्यटकांची होणारी गैरसोय व दुर्गंधी मुक्त समुद्र किनारे यासाठी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा व गोराई या चौपाट्यांवर रोज हजारो पर्यटक भेट देत असतात. समुद्रकिनारी चौपाट्यांवर येणाऱ्या पर्यटकांची शौचालय अभावी मोठी गैरसोय होत असते. यामुळे येणारे पर्यटक कुठेही शौच किंवा लघवी करतात आणि समुद्र किनाऱ्यावर दुर्गंधी पसरते. मुंबईतील समुद्र किनारे चौपाट्या पर्यटकांचे आकर्षण असून, दुर्गंधी मुक्त समुद्र किनारे यासाठी याठिकाणी मोबाईल टटॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे मोबाईल टॉयलेट तीन पुरुष व तीन महिलांसाठी असणार आहेत.

वॉटर टँक रिफिल करणे

मोबाईल टॉयलेटमध्ये थेट पाणी कनेक्शन देणे शक्य होणार नाही. यासाठी एक हजार लिटरचे वॉटर टँक बसवण्यात येणार आहेत. या वॉटर टँकचे पाणी रिफिल करुन पुन्हा वापर करणे संबंधित संस्थेस बंधनकारक असणार आहे.

याठिकाणी मोबाईल टॉयलेट

जुहू - ८, गिरगाव चौपाटी - २, अक्सा बीच - ४, दादर चौपाटी - २, वर्सोवा - ४ गोराई - ४

logo
marathi.freepressjournal.in