दमदार पावसामुळे मोडक सागर ओव्हरफ्लो

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते
दमदार पावसामुळे मोडक सागर ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत गेल्या १८ दिवसांत पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. त्यामुळे १२ जुलै रोजी सातही धरणात ७,२८,२८६ दशलक्ष लिटर पाणी म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच मोडक सागर ओव्हरफ्लो झाला आहे.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते.

धरणात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लवकरच सातही धरणात वर्षभराचा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सध्या सात तलावांत एकूण ७,२८,२८६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे मुंबईसाठी वर्षभरासाठी आवश्यक १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याच्या ५० टक्क्यांपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना १६ जानेवारी २०२३पर्यंत पुरेल इतका आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in