जैसलमेरमध्ये भारतीय संस्कृती व समरसतेचा महाकुंभ; देशभरातील विविध धर्म आणि पंथांचे वैचारिक मंथन; मोहन भागवतांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ

स्वर्णनगरी जैसलमेर येथे जैन समाजाचा भव्य आध्यात्मिक युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भारतीय संस्कृती आणि समरसता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
Published on

मुंबई : स्वर्णनगरी जैसलमेर येथे जैन समाजाचा भव्य आध्यात्मिक युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भारतीय संस्कृती आणि समरसता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ मार्चला या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून ८ मार्च पर्यंत श्रद्धा, तप व त्यागपरंपरेचा उत्सव सुरु राहणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाने समरसता कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. येत्या ६ मार्चपासून सुरू होणारा हा महोत्सव ८ मार्चपर्यंत चालणार असून यात सुमारे एक लाख भाविक सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर समरसता कार्यक्रमाच्या अनुषंगाने देशभरातून विविध धर्म आणि पंथांचे २५०० साधू, संत आणि महंत वसुधैव कुटुम्बकम् यावर वैचारिक मंथन करणार आहेत.

खरतरगच्छाधिपती पूज्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन सानिध्यात ८७१ वर्षानंतर युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादरचे दर्शन या चादर महोत्सवाच्या माध्यमाने नव्या पिढीला होणार आहे. जैन श्वेतांबर समुदायाचे प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या ८७१ वर्षांपूर्वीच्या अग्निसंस्कारावेळी त्यांचे शरीर भस्म झाले; मात्र त्यांचे पवित्र वस्त्र चादर, चोल-पट्टा व मुखपट्टी अक्षत राहिली. या अद्भुत व पवित्र चादरीच्या पूजनासाठीच चादर महोत्सव साजरा केला जातो. खरतरगच्छ समुदायासाठी हा महोत्सव अत्यंत आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो.

संपूर्ण देशात या आयोजनाबाबत मोठा उत्साह असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. महोत्सवादरम्यान दादा गुरुदेवांशी संबंधित पवित्र चादर, चोल-पट्टा व अन्य ऐतिहासिक वास्तूंचे विशेष पूजन, आराधना, प्रवचन, भक्ती कार्यक्रम, ऐतिहासिक किलोमीटरची शोभायात्रा तसेच सामूहिक धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहेत. हा महोत्सव आध्यात्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून समाजात धर्म, संयम, अहिंसा आणि सदाचाराचा संदेश प्रसारित करणारा आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in