
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तथा भाजपचे उदयोन्मुख नेते मोहित कंबोज यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपमधील अनेकांना धक्का बसला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मोहित कंबोज यांनी सक्रिय राजकारण सोडले असून त्यांनी स्वतःच याची पुष्टी केली आहे.
मोहित कंबोज सध्या भाजपचे सदस्य आहेत. पण मागील ६ महिन्यांपासून ते जाणीवपूर्वक सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. त्यांची आता त्यांच्या व्यवसायाला अधिक वेळ देण्याची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले आहे. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.