मुंबईकरांचे पैसे खड्ड्यात; १२ हजार कोटी खर्चूनही खड्ड्यांची समस्या कायम

मजबूत व टिकाऊ रस्ते मुंबईकरांना मिळावे, यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबई महापालिका खर्च करते.
मुंबईकरांचे पैसे खड्ड्यात; १२ हजार कोटी खर्चूनही खड्ड्यांची समस्या कायम

रस्तेदुरुस्तीसाठी एक, दोन नव्हे, तर तब्बल १२ हजार कोटी रुपये गेल्या पाच वर्षांत खर्च करण्यात आल्याचा दावा मुंबई काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केला आहे; मात्र मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून करदात्या मुंबईकरांचा पैसा कुठे खर्च झाला, याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे.

मजबूत व टिकाऊ रस्ते मुंबईकरांना मिळावे, यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबई महापालिका खर्च करते. तरीही मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याचे दिसून येते. पावसाळ्यात तर खड्ड्यात दुचाकीस्वाराचे अपघात होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईतील खड्डे आजही सुस्थितीत आहेत, ही आश्चर्याची बाब आहे.

खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर केला जातो. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. चकाचक रस्ते खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे करदात्या मुंबईकरांचा पैसा नेमका कुठे खर्च होतो, याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देवरा यांनी ट्विटद्वारे केली आहे.

...तर स्कूल बससेवा बंद करण्याचा इशारा

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून १ सप्टेंबर पर्यंत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त न झाल्यास स्कूल बससेवा बंद करण्यात येईल, असा इशारा स्कूल चालक मालक संघटनेने दिला आहे.

खड्डे असलेल्या रस्त्यांवरून स्कूल बस चालवण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते आहे. मुंबईत सुमारे ८ हजार स्कूलबस आहेत. वाहनचालकांना रस्त्यावरील खड्डे चुकवताना जिकिरीचे जाते आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने रस्ते खड्डेमय होणे संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. याकडे पालिका, सरकारचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने स्कूल बस संघटना आक्रमक झाली आहे. रस्त्यावर खड्डे असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत सोडणे अनेक वेळा शक्य होत नाही. शाळेत पोहोचण्यासाठी पाऊण तास लागत होता तो आता दीड तासाहून अधिक वेळ लागत असल्याने पालकांच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाकडूनही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे स्कूल बस असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in