
आज (१७ जुलै) राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्याचं दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहुन शिंदे सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या १९ आमदार असल्याचं सांगितल जात आहे.
मात्र आज विधिमंडळ्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभ राहुन शिंदे सकारविरोधी घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी 'असंविधानीक' आणि 'कलंकित' सरकारचा निषेध, अशी घोषणाबाजी केली. यावेळी मुंबई काँग्रेच्या प्रमुख वर्षा गायकवाड या सरकारचा निषेध करणारं काळं बॅनर पकताना दिसून आल्या.
अजित पवार यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांनी रविवार (१६ जुलै) यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आज विधीमंडळात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सरकारचा निषेध नोंदवत असताना राष्ट्रवादीचे आमदार कुठेही दिसून आले नाहीत. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या, तसंच यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.