मुंबईत मान्सून येण्यास ११ जून उजाडणार

मुंबईत मान्सून येण्यास ११ जून उजाडणार

कर्नाटकात मान्सूनचे आगमन झाले, तरीही मुंबईत मान्सून येण्यास ११ जून उजाडणार आहे, असे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. मान्सून येण्यास अनुकूल वातावरण आहे. तरीही गोवा, कोकणानंतरच मुंबईत पाऊस पडेल, असे खात्याने स्पष्ट केले. सध्या मान्सून कर्नाटकात पोहोचला आहे. मुंबई व परिसरात तो १५ जूनच्या आसपास सक्रिय होईल.

हवामान खात्याच्या मुंबई विभागाने सांगितले की, “आम्ही परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहोत. मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण आहे. तरीही मान्सून मुंबईत येण्यास ११ जून उजाडणार आहे. सध्या मान्सून कारवारपर्यंत पोहोचला असून, तो पहिल्यांदा गोव्यात, द. कोकणात दाखल होईल, त्यानंतर मुंबईत येईल,” असे त्यांनी सांगितले.

स्कायमेट वेदरचे महेश पलावत म्हणाले की, “मान्सूनपूर्व घडामोडींना सुरुवात झाली आहे. मान्सून मुंबईत येण्यास काही वेळ लागेल. ११ ते १२ जून रोजी मान्सून मुंबईत येईल. प्रारंभीच्या काळात तो मुसळधार नसेल. १५ जूनच्या नंतर पावसाची तीव्रता वाढू लागेल. सध्या केरळात मान्सूनची वाटचाल थंड पडली आहे; मात्र ईशान्य भारतात चांगला पाऊस सुरू आहे. जूनच्या मध्यापासून मुंबईत चांगला पाऊस सुरू होईल,” असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in