साडेपाच महिन्यात ११२ क्रमांकावर १४ हजारांहुन जास्त कॅाल

मदतीसाठी आलेल्या सर्वच कॉलना पोलिसांनी प्रतिसाद दिला
साडेपाच महिन्यात ११२ क्रमांकावर १४ हजारांहुन जास्त कॅाल
Published on

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने नागिरकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस फक्त एका कॉलवर या संकल्पनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी ते आतापर्यंतच्या एकुण साडेपाच महिन्यात ११२ क्रमांकाला तब्बल १४ हजार ३४२ जणांनी पसंती दिली आहे. मदतीसाठी आलेल्या सर्वच कॉलना पोलिसांनी प्रतिसाद दिला आहे.

पोलीस आयुक्तालयातील मीरा भाईंदर व वसई विरार ही मोठी शहरे असून ग्रामीण भाग सुद्धा त्यात आहे. अनेक गावे वा परिसर तर खूपच लांब पडतो.

त्यातच कमी वाहने व सुमारे ३५ टक्के मनुष्यबळ कमी असून देखील पोलीस आयुक्त सदानंद दाते व पोलीस उपायुक्त मुख्यालय विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली वायरलेस विभागाचे पोलीस निरीक्षक आरिफ सय्यद, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संदीप कदम व सहकारी

अधिकारी - कर्मचारी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या सहकार्याने पोलीस मदत मिळण्याच्या वेळेचे अंतर अल्पावधीत खूपच कमी करत आणले आहे.आलेले सर्वच कॉल पोलिसांना हाताळावे लागत असून त्यात तुरळक वेळा खोटे दिशाभूल करणारे कॉल सुद्धा आलेले आहेत. डायल ११२ मुळे अडीअडचणीत असलेल्या व एखादी दुर्घटना घडलेल्या ठिकाणी पोलीस पोहचत असल्याने लोकांना मोठा दिलासा मिळत आहे.

येणाऱ्या प्रत्येक कॉलचा आढावा नियंत्रण कक्षातून घेतला जात आहे. जास्त वेळ लागला तर नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यास कळवले जाते.

जानेवारी महिन्यात सरासरी पोलीस मदतीची वेळ प्रती कॉल मागे १६ मिनिटे २७ सेकंद इतके होते. परंतु मे मध्ये १० मिनिटे १७ सेकंद सरासरीने पोलिसांची मदत पोहचली आहे. यामध्ये महिलांच्या तक्रारीचा समावेश अधिक आहे. तसेच इतर गुन्हा होण्याच्या काही मिनिटातच पोलीस तिथे पोहोचत असल्यामुळे नागिरकांमध्ये आनंद आणि निर्भयमुक्त वातावरण पसरले आहे. यामुळे पोिलसांच्या कामगिरीबाबत प्रशंसा केली जात आहे. यामुळे गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात देखिल झालेली आहे. गुन्हा वा अपघात रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात तरी मदत पोहचण्याचे अंतर अग्निशमन दलाच्या धर्तीवर आणखी कमी होणे आवश्यक आहे. सर्वाधिक तक्रारी महिलांशी संबंधित असून जानेवारी पासून १४ जून पर्यंत २७४० तक्रारी आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in