आरोग्य शिबिरात १५ शेहून अधिक नागरिकांचा सहभाग

शिबिरात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आकर्षक भेटवस्तू भेट देण्यात आले
आरोग्य शिबिरात १५ शेहून अधिक नागरिकांचा सहभाग

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवडी विधानसभेच्या वतीने मोफत महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात पंधराशे नागरिकांनी सहभाग घेतला शिवसेना गटनेते शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या वतीने आणि केईएम रुग्णालय तसेच एफ दक्षिण विभाग यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्याच्या ११ चाचण्या मोफत करण्यात आल्या शिबिरात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आकर्षक भेटवस्तू भेट म्हणून देण्यात आले. तसेच मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरास शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते विभाग संघटीका किशोरी पेडणेकर पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, उपनेते मनोज जामसुतकर विधानसभा संघटक सुधीर साळवी, लता रहाटे उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण उपविभाग संघटिका श्वेता राणे रूपाली चांदे नगरसेवक श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, अनिल कोकीळ, सिंधु मसुरकर, दत्ता पोंगडे, डॉक्टर वाजा, मनपा एफ दक्षिण विभाग आरोग्य अधिकारी वैशाली खाडे तसेच सर्व शिवडी विधानसभेतील सर्व शाखाप्रमुख महिला शाखा संघटक युवा सेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in