एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी रेखाटली श्रीरामावर आधारित चित्र

या स्पर्धेमध्ये चित्रकला, निबंध, काव्य लेखन आणि नाट्य स्पर्धा घेतली गेली.
एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी रेखाटली श्रीरामावर आधारित चित्र

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १० जानेवारीपासून सुरू झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेची १७ जानेवारी रोजी सांगता झाली. शुक्रवारी पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. मुंबईतील ११४८ शाळांमध्ये ही स्पर्धा घेतली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक होती आणि यामध्ये १ लाख २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली ७० हजार चित्र शाळा व मंदिर परिसरात झळकणार आहेत.

या स्पर्धेमध्ये चित्रकला, निबंध, काव्य लेखन आणि नाट्य स्पर्धा घेतली गेली. स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन आणि निवडक नाटकांचे सादरीकरण बक्षीस वितरण कार्यक्रमात पहायला मिळाले. प्रभू श्रीरामांच्या येण्याने संपूर्ण भारत राममय झाला आहे, असे लोढा म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in