सकाळची भाईंदर लोकल एसीच धावणार; रेल्वे प्रशासनाने लोकप्रतिनिधींची मागणी धुडकावली

भाईंदरवरून सकाळी गर्दीच्या वेळी उपयुक्त ठरणारी ८.२४ वाजताची भाईंदर साधी लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल सोडण्यात आल्याने त्याला प्रवाशांसह खासदार, आमदार आदींनी विरोध करत तसे पत्र रेल्वे प्रशासनास दिले.
सकाळची भाईंदर लोकल एसीच धावणार; रेल्वे प्रशासनाने लोकप्रतिनिधींची मागणी धुडकावली
Published on

मुंबई : भाईंदरवरून सकाळी गर्दीच्या वेळी उपयुक्त ठरणारी ८.२४ वाजताची भाईंदर साधी लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल सोडण्यात आल्याने त्याला प्रवाशांसह खासदार, आमदार आदींनी विरोध करत तसे पत्र रेल्वे प्रशासनास दिले. परंतु रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसह सत्ताधारी भाजप - शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची मागणी धुडकावून लावत ८.२४ची लोकल ही एसीच धावणार, असे स्पष्ट केले आहे. भाईंदर रेल्वे स्थानकातून सकाळी ८.२४ वाजता भाईंदर ते चर्चगेट साधी लोकल सोडली जाते.  भाईंदरसह मीरारोडच्या नागरिकांना सकाळी कामावर जाण्यासाठी आणि कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी सदर लोकल उपयुक्त ठरत असल्याने प्रवाशांची मोठी सोय होत होती. कारण विरारवरून येणाऱ्या लोकलमध्ये सकाळी पाय ठेवायला सुद्धा मिळत नाही. अशी स्थिती असते. परंतु रेल्वे प्रशासनाने २८ नोव्हेंबर २०२४ पासून ८.२४ची साधी लोकल बंद करून त्याऐवजी एसी लोकल चालू केली. वास्तविक या वेळत एसी लोकलची मागणीच नव्हती. शिवाय विरारवरून येणारी एसी लोकल ही ८.२१वा. भाईंदर स्थानकात येते. त्यामुळे एसीने जाणाऱ्या प्रवाशांना ती लोकल चालून जाते. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार करून ८.२४ची लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शिष्टमंडळ रेल्वे प्रशासनास भेटून जिल्हा प्रमुख राजू भोईर यांचे निवेदन देण्यात आले. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी रेल्वे प्रशासनास पत्र देऊन ८.२४ची लोकल पूर्वीप्रमाणेच साधी लोकल करावी, अशी मागणी केली. मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या खासदार, आमदारांनी मागणी करूनही रेल्वे प्रशासनाने भाईंदर लोकल एसीच सोडणार यावर ठाम राहत सत्ताधाऱ्यांसह प्रवाशांच्या मागणीला केराचीटोपली दाखवली. आहे .

logo
marathi.freepressjournal.in