पंतप्रधान माेदींचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई करा; आ. गीता जैन यांची सायबर, नवघर पोलिसांत तक्रार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा श्री स्वामी समर्थ यांच्या मुखवट्यात बसवून 'स्वामी सत्यनाशी महाराज' असा संदर्भ लावून साधूसंतांचा अपमान व पंतप्रधान पदाचाही अपमान असल्याने...
पंतप्रधान माेदींचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई करा; आ. गीता जैन यांची सायबर, नवघर पोलिसांत तक्रार

भाईंंदर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा श्री स्वामी समर्थ यांच्या मुखवट्यात बसवून 'स्वामी सत्यनाशी महाराज' असा संदर्भ लावून साधूसंतांचा अपमान व पंतप्रधान पदाचाही अपमान असल्याने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार गीता जैन यांनी सायबर पोलीस आणि स्थानिक नवघर पोलिसांत तक्रार दाखल केली. फेसबुक अकाऊंटधारक मुजाहिद शेख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून पोलिसांनी तात्काळ फेसबुक वापरकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असे पत्र दिले आहे. पत्रकार परिषदेत आमदार गीता जैन यांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार युतीचा उमेदवाराचा निवडून आणण्यासाठी काम करणार त्यात आम्ही कुठलाच पक्ष बघणार नाही, तिथे युती म्हणून काम करणार असे म्हटले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in