मुंबईत डासांनी घातला थैमान;या भागात आढळले सर्वाधिक रुग्ण...

राज्याच्या आरोग्य विभागानं चिंता व्यक्त केली आहे
मुंबईत डासांनी घातला थैमान;या भागात आढळले सर्वाधिक रुग्ण...

सध्या मुंबईत डासांनी थैमान घातलं आहे. बोरिवली ते भायखळा या पट्ट्यातील सर्व परिसरात मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया  या आजारांनी सामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे. याबद्दल  राज्याच्या आरोग्य विभागानं  चिंता व्यक्त केली आहे.

या आजारांबद्दल  सर्वात वाईट स्थिती  मुंबईतील अंधेरी भागात  जास्तं आहे, जिथं  मलेरिया, डेंगी आणि चिकनगुनियाचे जास्त रुग्ण आढळून येतं आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत हंगामी आजारांचा उद्रेक झाला होता. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मलेरिया आणि डेंगीचे सर्वात जास्तं रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी ४३ टक्के रुग्ण हे मुंबईतील आहेत. तसेच, डेंगीच्या एकूण  मुंबईत ३२ टक्के रुग्ण आणि चिकनगुनियाच्या १८ टक्के रुग्णांचा समावेश आहे. या संदर्भात, राज्याच्या आरोग्य विभागान विशेषत: हॉटस्पॉट भागात वाढत्या प्रकरणांचा अभ्यास  करायला सुरवात केली आहे .
 

-मलेरिया
प्रभादेवी, लोअर परळ, हाजिअली, भायखळा, चिंचपोकळी,वरळी,  माझगाव, दादर, माहीम, शिवाजी पार्क, धारावी, अंधेरी आणि जोगेश्वरी-पश्चिम  माटुंगा, परळ, शिवडी, वडाळा, मुलुंड आणि विलेपार्ले.

-डेंगी
विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी-पूर्व , पश्चिम, वांद्रे, खार, सांताक्रूझ, बोरिवली, कांदिवली आणि भांडुप.

-चिकनगुनिया
अंधेरी, जोगेश्वरी-पूर्व आणि पश्चिम , मालाड आणि विलेपार्ले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in