
मुंबई : गर्भवती महिलांच्या सर्वांगीण काळजीसाठी ‘मदर अँड चाइल्ड केअर’ मजला सुरू करण्यात आला आहे. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात ही सुविधा सुरू करण्यात आली असून यामुळे एकाच छताखाली गर्भवती महिला आणि त्यांच्या नवजात बालकांना विशेष सुविधा मिळणार आहे.
या फ्लोअरमध्ये २९ खाटा आहेत. विशेषत: डिझाइन केलेल्या फ्लोअरवर आरोग्य तपासणी, आधुनिक ऑब्स्टेट्रिक्स, अव्वल लेबर सूट्स, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, उच्च जोखीम असलेल्या प्रसूतीचे व्यवस्थापन, प्रसूतीकाळ पूर्ण होण्यापूर्वी डिलिव्हरी, नवजात व पेडिएट्रिक केअर सेट-अप्स या सर्व गोष्टी आहेत. विशेष पद्धतीने या नवीन फ्लोअर ‘नेस्ट’चे उद्घाटन फोर्टिस हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशुताष रघुवंशी, व्यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी, आणि लेखिका, फिटनेस उत्साही मंदिरा बेदी यांच्या हस्ते करण्यात आले.
हिलिंग आर्किटेक्चर’च्या संकल्पनेवर आधारीत ही डिझाइन आहे. डिझाइन, नैसर्गिक प्रकाश (शरीराच्या उपचार प्रक्रियेला सहाय्य करण्यासाठी), रंग (सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी) आणि नैसर्गिक दृश्य (उबदारपणा व शांततेला चालना देण्यासाठी) यावर लक्ष केंद्रित करत फ्लोअरची बायोफिलिक डिझाइन केली गेली आहे. तसेच, अनुभवी ऑब्स्टेट्रिक्स व ग्यानेकोलॉजिस्ट्स, पेडिएट्रिशियन्स, निओनॅटोलॉजिस्ट्स, इंटेन्सिविस्ट्स, अॅनेस्थेसियोलॉजिस्ट्स, ऑब्स्टेट्रिकल नर्सेस व नर्स प्रॅक्टिशनर्स ‘नेस्ट’मधील रूग्णांची काळजी घेतील.
नेस्ट’ फ्लोअरमधून गर्भवती माता, नवीन माता व त्यांच्या नवजात बालकांना चांगली काळजी दिली जाईल. ओबीजीवायएन, पेडिएट्रिशियन्स, निओनॅटोलॉजिस्ट, नर्स प्रॅक्टिशनर्स दिवसातून चोवीस तास गर्भवती मातांची काळजी घेतील. मातांना पाठिंबा, काळजी मिळाल्याने मातृत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम असल्याचे वाटू शकते.