नवसाला पावणारी लालबागची माता

नवसाला पावणाऱ्या या मातेच्या मनमोहक रूपाने लालबाग परिसरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नवसाला पावणारी लालबागची माता

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥’ गणेशोत्सव आणि मुंबईकर हे समीकरण जरी ठरले असले तरी त्याच उत्साहाने, आत्मीयतेने महिला वर्गाकडून वाट पाहिली जाते ती नवरात्रोत्सवाची. सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात देवीच्या अनेक रूपांनी सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण केले असतानाच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली येथील लालबागची माता विशेष आकर्षण ठरत आहे. मंडळाचे यंदाचे ९५वे वर्ष असून नवसाला पावणाऱ्या या मातेच्या मनमोहक रूपाने लालबाग परिसरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या राजाचा विजय असो! हा जयजयकार निनादल्यानंतर अवघ्या १५ दिवसांच्या अंतराने ‘लालबागच्या मातेचा विजय असो’ या आवाजाने संपूर्ण लालबाग परिसर भारावून जाते. आपल्या हटके तितक्याच रूपवान, तेजोमय अंदाजात यंदा लालबागच्या मातेचे ९५ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे साधेपणाने साजरा होणारा नवरात्रोत्सव यंदा निर्बंधमुक्त असल्याने मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि लालबागची माता अशी ख्याती असलेल्या लालबाग येथील गणेशगल्ली मंडळाने आपल्या अंबे मातेसाठी साधा, आकर्षक देखावा उभारला आहे. या देखाव्याला चार चाँद लावले ते भव्य अशा दिव्यांच्या झुंबराने. या नवरात्र उत्सवात गोंधळ, भोंडला असे धार्मिक उपक्रम मंडळाकडून प्रतिवर्षी राबवण्यात येतात. तर समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने दरवर्षी मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर सारखे सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in