दुकानात जाण्याच्या वादातून आईला मुलाने चोपले क्रिकेट बॅट, दांडकासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण ;आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते
दुकानात जाण्याच्या वादातून आईला मुलाने चोपले
क्रिकेट बॅट, दांडकासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण ;आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई - दुकानात जाण्याच्या वादातून ५३ वर्षांच्या महिलेला तिच्याच मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. या मारहाणीत आयशा युसूफ गांधी ही गंभीररीत्या जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. क्रिकेट बॅट, दांडक्यासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने वसीम युसूफ गांधी या आरोपी मुलाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना रविवारी २६ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता वांद्रे येथील पेरी रोडच्या सचिन तेंडुलकरच्या बंगल्याजवळील वांद्रे सी हेवन बंगल्यात घडली. या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आयशा ही तिचा मुलगा वसीमसोबत राहते तर तिचा दुसरा मुलगा कॅनडा येथे शिक्षण घेत आहे. सध्या तो तिथेच वास्तव्यास आहे. तिच्या पतीच्या मालकीचा पायधुनी येथे एक आयुर्वेदिक औषध विक्रीचे दुकान आहे. याच दुकानावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता.

वसीमला आयशा ही दुकानात जाऊ नये असे वाटत होते, मात्र आयशा ही दुकानात जाण्यावर ठाम होती. रविवारी सकाळी सहा वाजता याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून त्याने आयशा हिच्यावर आधी क्रिकेटच्या बॅटसह लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर त्याने तिच्या पोटात, पाठीत लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन कानशिलात लगावली होती. या मारहाणीनंतर त्याने घरातील टिव्ही, मोबाईलच तोडफोड केली. घरातील सर्व सामानाचे नुकसान केले होते. या मारहाणीत ती गंभीररीत्या जखमी झाली होती. स्वतची सुटका करुन तिने घडलेला प्रकार वांद्रे पोलिसांनाा सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रविवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in