मोटारसायकल घसरणेदेखील अपघातच; HC चा निर्णय; मृत महिलेच्या कुटुंबीयांना ८ लाखांची भरपाई मंजूर

अपघात घडण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा सहभाग आवश्यक नाही. मोटारसायकल घसरण्याने देखील 'अपघात' होतो. त्यामुळे अशा अपघातातील पीडित व्यक्ती मोटार वाहन कायद्यांतर्गत भरपाई मिळण्यास पात्र ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : अपघात घडण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा सहभाग आवश्यक नाही. मोटारसायकल घसरण्याने देखील 'अपघात' होतो. त्यामुळे अशा अपघातातील पीडित व्यक्ती मोटार वाहन कायद्यांतर्गत भरपाई मिळण्यास पात्र ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी अपघाती मृत्यू झालेल्या विवाहित महिलेच्या कुटुंबीयांना ७,८२,८०० रुपये भरपाई मंजूर केली. या भरपाईची रक्कम वार्षिक ७.५ टक्के व्याजदराने देण्याचे आदेश दिले आहेत.

मोटारसायकलच्या साखळीत महिलेची साडी अडकली होती. त्यामुळे मोटारसायकल रस्त्यावर घसरून अपघात झाला. त्यात महिलेच्या मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी भरपाईसाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. तथापि, न्यायाधिकरणाने कुटुंबीयांना भरपाई देण्यास नकार दिला होता. तो आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी रद्दबातल ठरवला आणि महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई मंजूर केली.

अपघातातील मृत महिला ही पती आणि दोन लहान मुलांसह मोटारसायकलवरून प्रवास करीत होती. या प्रवासात महिलेची साडी मोटारसायकलच्या चाकात अडकल्याने मोटारसायकल रस्त्यावर पडली. त्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in