रुळ ओलांडताना मोटरमनचा मृत्यू, सिग्नल तोडल्यामुळे होते तणावाखाली; कामगार संघटनेचा दावा

गुरुवारी पनवेल-सीएसएमटी लोकल चालवताना एक सिग्नल मोडला होता.
रुळ ओलांडताना मोटरमनचा मृत्यू, सिग्नल तोडल्यामुळे होते तणावाखाली; कामगार संघटनेचा दावा
Published on

कमल मिश्रा/मुंबई : मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा (५४) यांचा भायखळा व सँडहर्स्ट रोड दरम्यान रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. शर्मा हे काम संपवून निघाले असताना ही घटना घडली.

सिग्नल तोडल्याने कारवाईची होती भीती!

गुरुवारी पनवेल-सीएसएमटी लोकल चालवताना एक सिग्नल मोडला होता. कारवाईच्या भीतीमुळे ते प्रचंड तणावाखाली होते. सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना त्यांना गाडीचे भान राहिले नसावे, त्यातूनच त्यांचा मृत्यू ओढवला असेल, असा आरोप कामगार संघटनेने केला आहे. मुरलीधर शर्मा हे मध्य रेल्वेत २००२ साली सहाय्यक गुड्स ट्रेन चालक म्हणून दाखल झाले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांना मोटरमन म्हणून त्यांना बढती मिळाली. शर्मा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in