मोटरमनला मिळणार ‘अलर्ट’

रेल्वे अपघात टळणार; केबिनमध्ये ऑडिओ सिस्टम
मोटरमनला मिळणार ‘अलर्ट’

मुंबई : मानवी चुकांमुळे होणारे अपघात, रूळावरुन लोकलचे डबे घसरणे, टक्कर होण्याचा इशारा, पुढचा सिग्नल लाल आहे सावध रहा, असे मेसेज आता मोटरमनला मिळणार आहेत. यासाठी मोटरमनच्या केबिनमध्ये ऑडिओ सिस्टिम बसवण्यात येणार आहे. यामुळे अपघात टाळण्यासाठी मोटरमनला अलर्ट मेसेज मिळणार आहे.

अपघात टाळण्यासाठी आता मोटरमनच्या केबिनमध्ये ऑडिओ सिस्टिम बसवण्यात येणार आहेत. या सिस्टिममुळे मोटरमनला अलर्ट मिळेल आणि होणारे अपघात टाळणे शक्य होईल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या डब्यात ऑडिओ अलर्ट डिव्हाईस बसवली जात आहेत. पुढचा रेल्वे सिग्नल लाल आहे, हे दर्शवताच मोटरमनला लोकल ट्रेन पूर्णपणे थांबवता येणार आहे. मुंबई विभागातील एकूण १५१ ईएमयू रेकपैकी ९० ईएमयू रेकमध्ये ही अलर्ट उपकरणे आधीपासूनच स्थापित केली जात आहेत. या ऑडिओ अलर्ट उपकरणाची किंमत १८ हजार रुपये आहे. ‘पिवळा सिग्नल पास केल्यानंतर, पुढील सिग्नल लाल आहे, सावध रहा,’ असा ऑडिओ अलर्ट मोटरमनला दिला जातो. ऑडिओ अलर्ट युनिटच्या तरतुदीमुळे एसपीएडी (सिग्नल पासिंग अॅट डेंजर) आणि रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्यास मदत होईल. उर्वरित ७१ रेक या ऑडिओ अलर्ट उपकरणासह मार्च २०२४ पर्यंत बसवण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in