Mount Mary Festival 2024: रविवारपासून सुरू होतेय माउंट मेरी जत्रा; १६ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीचे निर्बंध लागू

Mumbai Traffic Update: हे निर्बंध १६ सप्टेंबरपर्यंत लागू राहतील.
Mount Mary Festival 2024: रविवारपासून सुरू होतेय माउंट मेरी जत्रा; १६ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीचे निर्बंध लागू
Published on

मुंबई : रविवारपासून सुरू होणाऱ्या माऊंट मेरी जत्रेनिमित्त मुंबई वाहतूक पोलिसांनी वांद्रे पश्चिमेकडील चर्चच्या परिसरात वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध १६ सप्टेंबरपर्यंत लागू राहतील.

जत्रा कालावधीत माऊंट मेरी रोड हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. पोलिसांनी कार पास दिलेली स्थानिक रहि‌वाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहनांना जत्रा कालावधीत सकाळी ६ ते ११ वेळेत या मार्गावरून प्रवास करता येईल, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. जत्रा काळात या परिसरातील प्रवासासाठी केन रोड हा पर्यायी मार्ग असेल. परेरा रोड हा एकमार्गी असेल. विशेष पास जारी केलेले स्थानिक रहिवासी वगळता सेंट जॉन बाप्टिस्टा रोड सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असेल. दरवर्षी माऊंट मेरी जत्रेला गर्दी होते. त्यामुळे परिसरातील वाहतुकीत बदल केले जातात.

logo
marathi.freepressjournal.in