मुंबई-पुणे नव्या एक्स्प्रेस वेसाठी हालचाली सुरू; १३० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी निविदा

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख आर्थिक केंद्रांमधील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी पावले उचलली आहेत.
मुंबई-पुणे नव्या एक्स्प्रेस वेसाठी हालचाली सुरू; १३० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी निविदा
मुंबई-पुणे नव्या एक्स्प्रेस वेसाठी हालचाली सुरू; १३० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी निविदाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

स्वीटी भागवत/मुंबई

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख आर्थिक केंद्रांमधील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी पावले उचलली आहेत. या प्रस्तावित १३० किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेचा व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी प्राधिकरणाने सल्लागार कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पासाठी निविदा दस्तऐवज डाउनलोड करणे आणि बोली सादर करण्यासाठी २४ जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

या निविदेसंदर्भात कंपन्यांना ५ जूनपर्यंत शंका किंवा प्रश्न उपस्थित करता येतील, तर ‘प्री-बिड’ बैठक ८ जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केलेल्या अटींनुसार, भारतासोबत भूमी सीमा सामायिक करणाऱ्या देशांमधील बोलीदारांना वित्त मंत्रालयाने जुलै २०२० मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे नव्या एक्स्प्रेस वेसाठी हालचाली सुरू; १३० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी निविदा
रेल्वेच्या PRS प्रणालीमुळे बुकिंग क्षमतेत वाढ होणार; गर्दीच्या वेळेत वेग, विश्वासार्हता सुधारण्याचा प्रयत्न

सध्याचा ताण कमी होणार

सध्या अस्तित्वात असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. हा वाढता ताण कमी करण्यासाठी आणि वेगवान प्रवासासाठी हा नवा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे अतिरिक्त हायस्पीड कॉरिडोर म्हणून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in