मुंबई युथ काँग्रेसतर्फे मिलिटरी कॅम्पच्या बाहेर आंदोलन

अग्निपथ सैन्यभरती योजना लागू करून मोदी सरकार देशातील युवा तरुणांना बरबाद करणार आहे
मुंबई युथ काँग्रेसतर्फे मिलिटरी कॅम्पच्या बाहेर आंदोलन
Published on

ज्या प्रकारे किसानविरोधी काळे कायदे आणून मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना बरबाद केले. तशाच प्रकारे अग्निपथ सैन्यभरती योजना लागू करून मोदी सरकार देशातील युवा तरुणांना बरबाद करणार आहे, आम्ही हे मूळीच सहन करणार नाही, असे रोखठोक मत मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केले. अग्निपथविरोधात मुंबई युथ काँग्रेसतर्फे शनिवारी सांताक्रूझ येथील मिलिटरी कॅम्पच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

अग्निपथ योजनेंतर्गत फक्त ४ वर्षांची सैन्यातील नोकरी करून पुढील आयुष्यात देशातील तरुणांनी करायचे काय ? त्यांच्या पुढील आयुष्याच्या रोजगारासाठी सरकारने कोणतीही तजबीज केलेली नाही. ४ वर्षांची सैन्यातील नोकरी देऊन तरुणांना पुढील आयुष्यासाठी मोदी सरकारला हॉटेलच्या बाहेर बाऊनसर म्हणून उभे करायचे आहे काय, असा संतप्त सवाल मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांनी केंद्र सरकारला विचारला.

केंद्रातील भाजप सरकारच्या अग्निपथ सैन्यभरती योजनेविरोधात मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युथ काँग्रेसतर्फे मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रूझ येथील मिलिटरी कॅम्पबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान झिशान सिद्दीकी बोलत होते. या आंदोलनामध्ये झिशान सिद्दीकी यांच्या सोबत, मुंबई युथ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये मुंबई युथ काँग्रेसतर्फे अग्निपथ योजनेविरोधात व मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in