'या' पदावरून संजय राऊतांना हटवत, कीर्तिकरांची निवड; नेमकं प्रकरण काय?

शिवसेना शिंदे गटाने आज खासदार संजय राऊत यांना आणखी एक धक्का दिला असून खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली
'या' पदावरून संजय राऊतांना हटवत, कीर्तिकरांची निवड; नेमकं प्रकरण काय?

निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने कारवाई करण्यात सुरुवात केली असून बऱ्याच शिवसेनेच्या शाखा या शिंदे गटाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच, आज शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी शिंदे गटातील ज्येष्ठ नेते, खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली. याआधी यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी खासदार संजय राऊत होते. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संसदेतील शिवसेनेचे कार्यालयदेखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले होते. त्यानंतर संजय राऊतांची मुख्य गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यांनतर आज शिवसेनेने हे पाऊल उचलले आहे.

शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. "२१ फेब्रुवारी २०२३ला मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. यामध्ये एकमताने ठराव करण्यात आला आहे की, संजय राऊत हे आत संसदेतील मुख्य नेते नसणार आहेत. तर गजानन किर्तीकर यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in