खासदार हेमंत पाटील यांची कृती निषेधार्ह ; मुंबई मार्डकडून तीव्र निषेध

या कृतीने राज्यातील डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी मार्डने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे.
खासदार हेमंत पाटील यांची कृती निषेधार्ह ; मुंबई मार्डकडून तीव्र निषेध

मुंबई : नांदेड सरकारी महाविद्यालयाचे हंगामी अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे यांना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी स्वच्छतागृह साफ करायला लावले. पाटील यांची ही कृती निषेधार्ह असून, मुंबईतील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने याचा जोरदार निषेध केला आहे. या कृतीने राज्यातील डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी मार्डने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मनुष्यबळ, आवश्यक औषधांची कमतरता असतानाही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तेथील निवासी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानाही रुग्णसेवेत कोणतीही कसर ते ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत वाकोडे यांनी देण्यात आलेली वागणूक अमानवीय असून, संबंधितांनी या कृतीची जाहीर माफी मागावी नाही, तर मार्डकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान वैद्यकीय सेवा कोलमडली, तर त्याला डॉक्टरांना जबाबदार धरू नये, असा इशारा मुंबईतील मार्डच्या संघटनेने दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in