
मुंबई : सामना वृत्तपत्रातून बदनामीकारक वृत्त प्रसिध्द झाल्याने शिंदे-शिवसेना गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या १०० कोटी मानहानीच्या दाव्याची शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने गंभीर घेतली. न्यायालयाने शिवसेना कार्याध्यक्ष सामना वृत्तपत्राचे संपादक उध्दव ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी समन्य बजावले. पुढील होणाऱ्या ३१ जुलैच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
सामना या मुख्यपत्रातून खासदार शेवाळ यांच्या विरोधात २९ डिसेंबर २०२२ रोजी आक्षेपार्ह वृत्त प्रसिध्द करण्यात आले. शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय आहे, त्यामध्ये राहुल शेवाळे यांचा सहभाग असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. याप्रकरणी शेवाळे यांनी शिवडी सत्र न्यायालयात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यावर शुक्रवारी सुनावणी झाली; मात्र उध्दव ठाकरे आणि संजय राऊत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने यांच्या विरोधात समनस बजावून ३१ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.