खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

शौचालय घोटाळ्यात मेधा सोमय्या यांच्या सहभाग असल्याचा आरोप केल्याने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मेघा सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे .

शिवसेना नेत संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू असतानाच खा. राऊत यांनी किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय प्रकरणात घोटळा केल्याचा आरोप केला आहे. खा. राऊत यांनी केवळ दहशत निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारे खोटे आरोप करून आपली बदनामी केल्याचा आरोप करून मेधा सोमय्या यांनी उच्च न्यायालयात १०० कोटी रूपयाचा नुकसान भरपाईचा दावा केला आहे.

याचिकाकर्त्या या गेली २० वर्षे रूईया या महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.टाटा सामाजिक विज्ञान संस्था, जन शिक्षण संस्था, रायगड, युवा प्रतिष्ठान या संस्थांशी संबंधित आहेत. २५ पेक्षा जास्त सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे आणि योगदान देत आहे. असे असताना राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप याचिकेत करताना खा. राऊत यांना लेखी माफी मागण्या बरोबरच पत्रकार परीषद घेण्यास तसेच लेखन करून ते प्रसिध्द करण्यास मनाई करावी, असा अंतरिम आदेश देण्याची विनंती केली आहे. तसेच अंतिम सुनावणीनंतर त्यांना दंड ठोठावून दंडाची रक्कम धर्मदाय संस्थान दान करण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली आहे. या याचिकेवर उन्हाळ्याच्या सुटीनंतर नियमित न्यायालयात जून महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in