एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारीपर्यंत करता येणार नोंदणी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

एमपीएड आणि एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास ५ ते २० जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत एमपीएड अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १ हजार ३८ तर एमएड अभ्यासक्रमास १ हजार २३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमपीएड अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २४ मार्च रोजी होणार असून फिल्ड परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे.तसेच एमएड अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

मागील तीन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची झालेली नोंदणी

मागील वर्षी या दोन प्रवेश परीक्षेमध्ये ६१९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये एम.पी.एड. सीईटीसाठी २ हजार ३८४ आणि एम.एड. सीईटीसाठी ३ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्याचप्रमाणे एम.पी.एड. सीईटीसाठी २०२३-२४ मध्ये २०८८ विद्यार्थ्यांनी तर २०२४-२५ मध्ये २ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्याचप्रमाणे एम.एड. सीईटीसाठी २०२३-२४ मध्ये ३ हजार ६६ आणि २०२४-२५ मध्ये २ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in