३० एप्रिलला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक; एमपीएससीला दयावे लागले स्पष्टीकरण

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा ३० एप्रिलला सुरु होणार असताना टेलिग्रामवर तब्बल ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक
३० एप्रिलला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक; एमपीएससीला दयावे लागले स्पष्टीकरण

३० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, त्याआधीच परीक्षेचे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हे टेलिग्रामवरून एका चॅनलवर लीक झाल्याचे समोर आले. यानंतर सर्व राज्यात एकच गोंधळ उडाला होता. यासंदर्भात आयोगाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच, त्यांनी यावर स्पष्टीकरणदेखील देण्यात आले असून एल ट्विट केले आहे.

एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी सांगितले की, "एका टेलिग्राम चॅनलवर परीक्षेचा डेटा लीक झाल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने सायबर पोलिसांकडे आम्ही तक्रार दिली असून त्यातील वस्तुस्थिती पडताळणी केली जाणार आहे." तसेच, ३० एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. सायबर पोलिस या प्रकरणावर तपास करणार आहेत. त्यानंतर सत्यता पडताळून पेपर कधी होणार? की ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार? हे निश्चित केले जाईल.यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलला एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट एका टेलिग्राम चॅनलवर लीक करण्यात आले. यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, तब्बल ९० हजारांपेक्षा अधिक विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले असून ते एका टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपरसुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला. यावरून केलेल्या तक्रारीनंतर आता पोलीस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in