एसटीची NCMC कार्ड सक्ती रद्द करा! राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची मागणी

एसटी प्रवासासाठी शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्याने राज्यभरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुरेशा पूर्वतयारीशिवाय या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटीची NCMC कार्ड सक्ती रद्द करा! राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची मागणी
एसटीची NCMC कार्ड सक्ती रद्द करा! राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची मागणी
Published on

मुंबई : एसटी प्रवासासाठी शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्याने राज्यभरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुरेशा पूर्वतयारीशिवाय या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही सक्ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

पाटील यांनी यासंदर्भात शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे. “सर्व्हर डाऊन, कार्डाचा तुटवडा आणि रिचार्जमधील त्रुटीमुळे राज्यभर गोंधळ उडाला आहे. हक्काची सवलत नाकारल्याने प्रवाशांना पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागत आहेत. महामंडळाने १४ आणि ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती सूट दिली असली तरी ती केवळ मलमपट्टी असून, या निर्णयामागील मूळ तांत्रिक त्रुटी दूर झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही,” असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.‌

एसटीने सवलत घेताना प्रत्यक्ष बसने प्रवास करणाऱ्या महिलांकडून स्वतंत्र कार्डची मागणी करणे हे विसंगत आणि दुटप्पी धोरण असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in