मुकेश अंबानींना २०० नंतर ४०० कोटींची मागणी; तिसऱ्यांदा आला धमकीचा ईमेल....

या धमकीच गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ताबोडतोब सोमवारी अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) इथं सुरक्षा वाढवली आहे.
मुकेश अंबानींना २०० नंतर ४०० कोटींची मागणी; तिसऱ्यांदा आला धमकीचा ईमेल....

भारतातील उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना परत एकदा धमकीचा ईमेल आला आहे. ही धमकी त्याचं अज्ञात व्यक्तीनं दिली आहे. ज्यानं 27 ऑक्टोबर रोजी दोन ईमेल मुकेश अंबानी यांना पाठवून 200 कोटी रुपयांची मागणी केली होती. आता या तिसर्‍या ईमेलमध्ये, त्या व्यक्तीनं खंडणीची रक्कम वाढवून 400 कोटी रुपये केली आहे. कारणं अंबानींनी त्यांच्या मागील दोन ईमेलला काही उत्तर दिलं नव्हतं.

या धमकीच गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ताबोडतोब सोमवारी अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) इथं सुरक्षा वाढवली आहे. त्या अज्ञात व्यक्तीनं पहिला धमकीचा ईमेल 26 ऑक्टोबरला केला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीनं 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर त्याची किंमत 200 कोटी रुपये करण्यात आली. पैसे दिले नाहीत तर मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असं ही धमकीच्या मेलमध्ये लिहलं होते.

अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवलेल्या तिसऱ्या ईमेलमध्ये लिहिल आहे की, ''तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत 400 कोटी रुपये इतकी आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत.''असं त्या ईमेल मध्ये लिहलं होते.

मुकेश अंबानींना अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी देखील गेल्या वर्षी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून धमकीचे कॉल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. त्या आरोपींने मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुकेश अंबानींना दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in