

मुंबई : रिलायन्सच्या तेल, दूरसंचार, किरकोळ विक्री क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीजमधील दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी मुलांकडे सोपवण्याची प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे आली आहे, असे अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी जाहीर केले. कंपनीमधील नेतृत्वबदल अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
ईशा अंबानी : किरकोळ विक्री आणि ग्राहक उत्पादने व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत.
आकाश अंबानी : माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व्यवसायाची धोरणे सांभाळत आहेत.
अनंत अंबानी : पारंपरिक ऊर्जा, तेल ते रसायन आणि नवीन ऊर्जा क्षेत्राची ध्येयधोरणे निश्चित करत आहेत.
५०० तरुण नेत्यांची फळी सज्ज
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ते स्वतः मुख्य मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहतील, परंतु त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी ३० आणि ४० वयोगटातील ५०० तरुण नेत्यांची फळी विविध व्यवसायांमध्ये तयार करण्यात आली आहे. हे तरुण नेते आपल्या क्षेत्रातील उच्च दर्जाचे ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाण घेऊन आले आहेत. रिलायन्सची संस्थात्मक संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि कामगिरीचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी ज्येष्ठ अधिकारी त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
तीन मुले आणि जबाबदाऱ्यांचे वाटप
कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले की, त्यांची तिन्ही मुले आता समूहातील प्रमुख व्यवसायांचे नेतृत्व करत असून ती कंपनीला विकासाच्या पुढील टप्प्यावर घेऊन जातील.