उद्योगपती मुकेश अंबानी यांनी धमकीचे ईमेल पाठवणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला शनिवारी पहाटे मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गणेश रमेश वनपारधी असं या युवकाचं नाव असून तो तेलंगणातील असल्यांची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणाला ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गेल्या आठवड्याभरात पाच ईमेल आले होते. यात त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. तसंच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशी माहिती पोलिासांनी दिली आहे.
"हे काम किशोरवयीन मुलांनी केलं असल्याचं दिसून येत आहे. आमचा तपास सुरु आहे. आणि आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करु", असं म्हणत मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.
शादाब खान या नावाने २७ ऑक्टोबर रोजी केलेल्या ईमेलमध्ये लिहिले होते की, "जर तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शुटर आहेत."
याच बरोबर मुकेश अंबानी यांना आणखी एक धमकीचा ईमेल आला होता. त्यांच्याकडून ४०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. हे धमकीच्या ईमेलचे प्रकरण सातत्याने सुरु असून नवीव आलेल्या मेलमध्ये याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान आलेल्या २ ईमेलमध्ये पाठवणाऱ्याने आपली ओळख शादाब खान अशी करुन दिली आहे.