मेट्रो मुंबईकरांच्या जीवाशी खेळतेय; LBS रोडवर पुन्हा अपघात, तज्ज्ञ डॉक्टर थोडक्यात बचावल्या

दोन महिन्यांपूर्वीच एलबीएस रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाइन ४ च्या पॅरापेट वॉलचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच रस्त्यावर आधीच्या घटनेच्या ठिकाणापासून १० मीटर अंतरावर मुलुंड पश्चिम येथे आणखी एक अपघात घडला.
मेट्रो मुंबईकरांच्या जीवाशी खेळतेय; LBS रोडवर पुन्हा अपघात, तज्ज्ञ डॉक्टर थोडक्यात बचावल्या
मेट्रो मुंबईकरांच्या जीवाशी खेळतेय; LBS रोडवर पुन्हा अपघात, तज्ज्ञ डॉक्टर थोडक्यात बचावल्या
Published on

मुंबई : दोन महिन्यांपूर्वीच एलबीएस रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाइन ४ च्या पॅरापेट वॉलचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच रस्त्यावर आधीच्या घटनेच्या ठिकाणापासून १० मीटर अंतरावर मुलुंड पश्चिम येथे आणखी एक अपघात घडला. यावेळी मेट्रो साइटवरून लाकडी फळी चालत्या कारवर आदळली. या घटनेत डॉक्टर थोडक्यात बचावले. दरम्यान, मेट्रोच्या निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका सुरूच असून मेट्रो मुंबईकरांच्या जीवाशी खेळतेय, अशी भावना मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

मुलुंड पश्चिम एलबीएस रोडवर फेब्रुवारी महिन्यात मुंबई मेट्रो लाइन ४ च्या पॅरापेट वॉलचा काही भाग कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि तीन जण जखमी झाले होते. आधीच्या घटनेपासून १० मीटर अंतरावर मेट्रो साइटवरून ३x८ फूट आकाराची लाकडी फळी यू-टर्न घेत असलेल्या कारवर पडली. त्यामुळे कारच्या छताचे मोठे नुकसान झाले. ही कार मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलचे इंटरनल आणि इन्फेक्शस डिसीजेस विभागाच्या संचालक डॉ. अनिता मॅथ्यू यांची होती. त्यांच्या कारचा चालक राजन नायर यांच्यासोबत फोर्टिस हॉस्पिटलकडे जात होत्या. कोविड-१९ काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मेट्रो मुंबईकरांच्या जीवाशी खेळतेय; LBS रोडवर पुन्हा अपघात, तज्ज्ञ डॉक्टर थोडक्यात बचावल्या
Mumbai : ४०० टन वजनी क्रेन उलटली; BKC मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठा अपघात

कामावर २४ तास देखरेख ठेवा!

ही घटना मिलान बिल्डटेक एलएलसीच्या सततच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. त्यांच्या बेफिकीर कामकाजामुळे मुंबईकरांचे जीव धोक्यात आले आहेत. एमएमआरडीए आयुक्तांना तत्काळ त्यांचे कंत्राट रद्द करावे, कंत्राट रद्द करेपर्यंत एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी २४ तास त्यांच्या कामावर देखरेख ठेवावी, अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे.

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा!

दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. मेट्रो कंत्राटदार मिलान बिल्डटेक एलएलसी याचे कंत्राट तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. कंत्राट रद्द होईपर्यंत एमएमआरडीएने त्यांच्या कामावर दिवस-रात्र देखरेख ठेवावी, अशीही त्यांनी मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in