मुंबईवर ११ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच; २,१४० कोटींच्या खर्चास राज्य सरकारची मंजुरी

दहशतवादी हल्ला, अंतर्गत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विस्तारले जात आहे. यात एकूण ११ हजार ३७७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यापैकी १० हजार ४९१ कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
मुंबईवर ११ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच; २,१४० कोटींच्या खर्चास राज्य सरकारची मंजुरी
Published on

मुंबई : दहशतवादी हल्ला, अंतर्गत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विस्तारले जात आहे. यात एकूण ११ हजार ३७७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यापैकी १० हजार ४९१ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. एल ॲन्ड टी कंपनीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून उर्वरित ८६६ सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसवण्यात येणार आहेत. परंतु देखभाल-दुरुस्ती, हार्डवेअर बदल करणे यासाठी २,१४०. ९० कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा मुंबईला धोका असून अंतर्गत गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि कॅमेऱ्यांची देखभाल-दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मुंबईत दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणले जात आहेत. यात ११ हजार ३७७ कॅमेरे बसवण्यात येणार असून यापैकी १० हजार ४९१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुंबईवर वॉच ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांची देखभाल-दुरुस्ती गरजेचे आहे. देखभाल-दुरुस्ती, हार्डवेअर बदल करणे या कामासाठी २,१४०.९० कोटी रुपये खर्चास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

...म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे!

  • नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांचा तपास, वाहतूक व्यवस्थापन व मोटार वाहन कायदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे कारवाई करण्यासाठी सहाय्यभूत प्रणाली विकसित करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.

  • कोस्टल रोडसह महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे.

  • सार्वजनिक ठिकाणी ओळख क्षमता वृद्धीस सहाय्यभूत ठरणाऱ्या फेशियल रिकग्निशन कॅमेरे तंत्राचा वापर करणे.

  • गर्दीच्या ठिकाणी व सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या क्षेत्राबाहेर आवश्यकतेनुसार फेस रिकग्निशन क्षमतेसह विकसित मोबाईल सर्व्हेलन्स पोल्सचा वापर करून निरीक्षण क्षमता वृद्धी करणे.

logo
marathi.freepressjournal.in