मुंबई: ११ वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; यंदा कट-ऑफ किती? पहिल्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश?

मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये १ लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यामध्ये ५५ हजार ६५५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगइनमध्ये जाऊन चेक ॲलॉटमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून कोणते कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले आहे हे पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगइनमध्ये जावून अपलोड रिकवाईड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करून आपली सहमती या ऑप्शनवर क्लिक करून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विहीत कालावधीत प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

-अकरावी प्रवेशासाठी एकूण उपलब्ध जागा २ लाख ४६ हजार ५०

-पहिल्या गुणवत्ता यादीसाठी प्राप्त विद्यार्थी २ लाख २८ हजार ३१२

-पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये एकूण ॲलाॅटमेंट विद्यार्थी - १ लाख ३० हजार ६५०

-पहिल्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय ५५ हजार ६५५ विद्यार्थ्यांना मिळाले.

-दुसऱ्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय २० हजार ७८३ विद्यार्थ्यांना मिळाले.

-तिसऱ्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय १४ हजार।४४८ विद्यार्थ्यांना मिळाले.

शाखानिहाय ॲलॉट करण्यात आलेले विद्यार्थी

कला - १२ हजार ८०८

वाणिज्य - ६९ हजार ६९

विज्ञान - ४८ हजार १४३

एचएसव्हीसी - ६३९

महाविद्यालयांचे कट ऑफ

-एचआर महाविद्यालय - वाणिज्य - ४६५

-सेंट झेविअर्स - कला ४६७, वाणिज्य ४४६, विज्ञान ४५८

-के.सी. महाविद्यालय - कला ४३०, वाणिज्य ४५७, विज्ञान ४३८

-जय हिंद महाविद्यालय - कला ४४८, वाणिज्य ४५८, विज्ञान ४४४

-रुईया महाविद्यालय - कला ४६१, विज्ञान ४६७

-पोतदार महाविद्यालय - वाणिज्य ४७२

-रूपारेल महाविद्यालय - कला ४२९, वाणिज्य ४५३, विज्ञान ४५९

-साठे महाविद्यालय - कला ४०५, वाणिज्य ४४६, विज्ञान ४५३

logo
marathi.freepressjournal.in