मुंबईतील १५ तलाव होणार पुनरुज्जीवित; राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त, BMC सल्लागाराची नियुक्ती करणार

मुंबईतील तलावांची दुरवस्था झाली असून पुसत चाललेली ओळख पुन्हा जिवंत करण्यात येणार आहे. हे तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
मुंबईतील १५ तलाव होणार पुनरुज्जीवित; राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त, BMC सल्लागाराची नियुक्ती करणार
मुंबईतील १५ तलाव होणार पुनरुज्जीवित; राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त, BMC सल्लागाराची नियुक्ती करणार
Published on

मुंबई : मुंबईतील तलावांची दुरवस्था झाली असून पुसत चाललेली ओळख पुन्हा जिवंत करण्यात येणार आहे. हे तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे तलाव पुनरुज्जीवित करण्यासाठी मुंबई महापालिकेचा वातावरणीय बदल व पर्यावरण विभाग सल्लागाराची नियुक्ती करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत सुमारे १४० तलाव आहेत. मात्र कचऱ्याचा भार आणि तलावांमधील वनस्पती व जीवजंतूंच्या अस्वच्छ परिस्थितीमुळे तलावतील पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने, प्रस्तावित योजनेत तलावाच्या परिसरातील गाळ काढणे, स्वच्छता करणे तसेच संपूर्ण सुशोभीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

खासदार पियूष गोयल यांनी मुंबईतील दुरवस्था झालेल्या तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबईतील प्रथम १५ तलाव पुनरुज्जीवित केले जाणार आहेत. हे तलाव राज्य सरकारच्या अखत्यारितील असून त्यांच्या कामासाठी नुकतेच ना हरकत प्रमाणपत्र मुंबई महापालिकेला प्राप्त झाले आहे. आता सल्लागाराची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

हे तलाव होणार पुनर्जीवित

मालाड मालवणी, मनोरी, मढ, एरंगळ, दारवली भागातील १५ तलाव आहेत. यामध्ये पाथरेवाडी, अली, कमल, दारीवली, भाटी, हिरादेवी, वेनीला, भुजाले तलाव, करजाई देवी तलाव, खरताळे तलाव, सुमलई तलाव, गाव तलाव, पोसरी तलाव, हरबादेवी तलाव, शांताराम तलाव यांचा समावेश आहे. पुनर्जीवन करताना तलावातील दूषित पाणी काढताच आजूबाजूच्या परिसरातील वास्तव्य करणारे पशुपक्षी, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा विचारही केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in