Mumbai : धक्कादायक! मुंबई पुन्हा हादरली; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

मुंबईच्या (Mumbai) लोअर परेल परिसरात एका १६ वर्षांच्या मुलीवर ६ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर
Mumbai : धक्कादायक! मुंबई पुन्हा हादरली; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणारी मुंबई ही महिलांसाठी सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये महिलांवर वरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईच्या लोअर परेल परिसरामध्ये घडली आहे. ६ नराधमांनी एका १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेतील ३ आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या मित्राने २३ डिसेंबर रोजी त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथेच सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास एन एम जोशी पोलिसांच्या हाती आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. आरोपींवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून ३ अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी भागातील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी हे एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.

याच महिन्यात एका महिलेसोबत सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. त्यामुळे आता मुंबईसारख्या शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in