Mumbai : विक्रोळीत दुचाकी घसरून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू 

विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरील गोदरेज सिग्नल जवळ गुरुवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरली.
Mumbai : विक्रोळीत दुचाकी घसरून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू 
Mumbai : विक्रोळीत दुचाकी घसरून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू 
Published on

मुंबई : विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरील गोदरेज सिग्नल जवळ गुरुवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरली. या दुर्घटनेत दोशी जैनम जयेशभाई (१९) याचा मृत्यू झाला असून धैर्य अनिल भानुशाली किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.‌ 

विक्रोळी पूर्व येथील ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील गोदरेज सिग्नलजवळ गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता घाटकोपरहून विक्रोळीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर सुझुकी जिक्सर (एमएच-०४/एचव्ही-३८९५) ही दुचाकी घसरली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही युवक गंभीर जखमी झाले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्याआधी पोलिसांनी दोन्ही जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. राजावाडी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोशी जैनम जयेशभाई (१९) याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर धैर्य अनिल भानुशाली हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in