Mumbai : सुरक्षा उपाययोजनांसाठी पालिका एआयचा वापर करणार

मुंबई : मुंबई पालिकेची सुरक्षा दल अधिक अद्ययावत अणि बळकट करण्याकरिता तसेच सुरक्षा खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्याकरिता महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील,अशी ग्वाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिली.
सुरक्षा उपाययोजनांसाठी पालिका एआयचा वापर करणार
सुरक्षा उपाययोजनांसाठी पालिका एआयचा वापर करणारसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई पालिकेची सुरक्षा दल अधिक अद्ययावत अणि बळकट करण्याकरिता तसेच सुरक्षा खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्याकरिता महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील,अशी ग्वाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिली.

आधुनिकीकरणाच्या दृष्टीने अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांकरिता ई-मस्टर प्रणाली कार्यान्वित होणार आहे, असे जाधव यांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा ५९ वा वर्धापन दिन (१ मार्च) भांडुप संकुलस्थित सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह विविध अधिकारी, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरक्षा दलामार्फत दिमाखदार आणि शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. तसेच शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या, विशेष कामगिरी बजावलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.

पालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॕमेरा पथदर्शी प्रकल्प अंतर्गत केईएम रुग्णालय आणि शीव रुग्णालय, नायर धर्मार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व कुपर रूग्णालयात कॅमेरे आहेत. प्रसुतिगृह आणि उपनगरीय रूग्णालयातदेखील कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परिसरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहर्यााची ओळख संबंधिचा तपशील तसेच परिसरात ये - जा करणार्याय वाहनांची माहितीही मिळवणे शक्य होईल.

logo
marathi.freepressjournal.in