नामांकित महाविद्यालयांच्या ‘कट ऑफ’मध्ये किंचित घट; ११ वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

दुसऱ्या यादीत ७३ हजार ४३८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यापैकी २० हजार ३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी सकाळी १० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये नामांकित महाविद्यालयांच्या ‘कट ऑफ’मध्ये किंचित घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशाची चुरस कायम आहे. दुसऱ्या यादीत ७३ हजार ४३८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यापैकी २० हजार ३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

प्रवेशाच्या दुसऱ्या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक ॲलॉटमेंट स्टेटस’ या ऑप्शनवर क्लिक करून कोणते कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले आहे, हे पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन अपलोड ‘रिक्वाईड डॉक्युमेंट’ या ऑप्शनवर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करून ‘आपली सहमती’ या ऑप्शनवर क्लिक करून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विहित कालावधीत प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले असल्यास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा. ज्या विद्यार्थांना दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश मिळाला नाही, त्यांनी दहावीमध्ये मिळालेले गुण व संबंधित महाविद्यालयाचे ‘कट ऑफ’ याचा विचार करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अर्जाचा भाग-२ लॉक करावा लागणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

-दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा १ लाख ९३ हजार ७९२

-दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्राप्त विद्यार्थी १ लाख ७५ हजार ८

-दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये एकूण अलोटमेंट विद्यार्थी - ७३ हजार ४३८

-पहिल्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय २० हजार ३० विद्यार्थ्यांना मिळाले.

-दुसऱ्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय १३ हजार ४६९ विद्यार्थ्यांना मिळाले.

-तिसऱ्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय १० हजार ३८८ विद्यार्थ्यांना मिळाले.

शाखानिहाय जागा आणि ॲलॉट करण्यात आलेले विद्यार्थी

कला २८ हजार २३८ ६ हजार १२४

वाणिज्य १ लाख २ हजार २२ ४३ हजार ३६७

विज्ञान ६० हजार ७३२ २३ हजार ५३३

एचएसव्हीसी २ हजार ८०० ४१४

पहिल्या पसंतीचे प्रवेश मिळालेले शाखानिहाय विद्यार्थी

कला २ हजार ४७३

वाणिज्य १० हजार २७०

विज्ञान ६ हजार ९०२

एचएसव्हीसी ३८५

महाविद्यालयांचे कट ऑफ

एचआर महाविद्यालय - वाणिज्य - ४६२

सेंट झेविअर्स - कला ४६४, वाणिज्य ४४०, विज्ञान ४४८

के.सी. महाविद्यालय - कला ४२५, वाणिज्य ४५६, विज्ञान ४३२

जय हिंद महाविद्यालय - कला ४४६, वाणिज्य ४५६, विज्ञान ४३७

रुईया महाविद्यालय - कला ४५८, विज्ञान ४६२

पोदार महाविद्यालय - वाणिज्य ४७१

रुपारेल महाविद्यालय - कला ४२४, वाणिज्य ४५१, विज्ञान ४५४

साठे महाविद्यालय - कला ३९३, वाणिज्य ४४४, विज्ञान ४४८

logo
marathi.freepressjournal.in