मुंबईत तीन वर्षांत ३४ हजार ८०५ पुरुष, स्त्रियांची नसबंदी; लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाचा उपक्रम

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येवर आळा बसवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम मुंबई महानगरात राबविण्यात आले.
मुंबईत तीन वर्षांत ३४ हजार ८०५ पुरुष, स्त्रियांची नसबंदी; लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाचा उपक्रम
Published on

मुंबई : मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येवर आळा बसवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम मुंबई महानगरात राबविण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत गत तीन वर्षांमध्ये (२०२२-२३ ते २०२४-२५) पुरुष आणि स्त्री नसबंदी मिळून एकूण ३४ हजार ८०५ शस्त्रक्रिया करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबई तसेच अन्य शहरांमध्ये लोकसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर आळा बसवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात असतानाच मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, प्रसूतिगृहे यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष-स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडल्या जात आहे. कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रमांतर्गत गत तीन वर्षांमध्ये (२०२२-२३ ते २०२४-२५) मुंबई महानगरात एकूण ३४ हजार ८०५ पुरुष आणि स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

तर पालिकेच्या एफ / दक्षिण कुटुंब कल्याण केंद्र विभागाला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. पुरुष नसबंदी व स्त्री शस्त्रक्रियेनंतर, प्रसूतिपश्चात तांबीनंतर शासन नियमानुसार रुग्णाला मोबदला दिला जातो. स्त्री आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेअंतर्गत अयशस्वी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी तसेच शस्त्रक्रियेदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येते. तसेच, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नि:शुल्क पद्धतीने सेवा पुरविल्या जातात.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अंतर्गत स्त्री नसबंदी आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, तांबी बसविणे, गर्भनिरोधक गोळी (स्त्रियांच्या वापरासाठी), प्रचलित संतती प्रतिबंधक (निरोध), 'अंतरा' इंजेक्टेबल गर्भनिरोधक आदी साधनांचे पालिकेच्या वतीने वाटप करण्यात येते.

संतती नियमनाच्या उपाययोजनांची आकडेवारी

  • पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया १४६७ हजार

  • स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ३३ हजार ३३८

  • अंतरा इंजेक्टेबल गर्भनिरोधक इंजेक्शन १० हजार १७५ महिला

  • तांबी (कॉपर टी) ६१ हजार ३५३ महिला.

  • संतती प्रतिबंधक (निरोध) ३२ हजार ७० जणांना

  • गर्भनिरोधक गोळ्या ५६ हजार महिला

logo
marathi.freepressjournal.in