मुंबईत ४४ तास पाणीकपात! २० ते २२ जानेवारीला जलवाहिनी जोडणार

मुंबईकरांवर ४४ तासांचे पाणीसंकट ओढवणार आहे.
मुंबईत ४४ तास पाणीकपात! २० ते २२ जानेवारीला जलवाहिनी जोडणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘मेट्रो ७-अ’ प्रकल्पासाठी २,४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आला आहे. वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्यामुळे मंगळवार २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईकरांवर ४४ तासांचे पाणीसंकट ओढवणार आहे.

दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. तसेच अन्य काही भागातील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जी. नॉर्थ, के. पूर्व, एस, एच. पूर्व आणि एन. विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होईल. काही भागात पाणीपुरवठा कमी होईल. नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळादेखील बदलल्या जातील. बाधित भागातील रहिवाशांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in