Mumbai : बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत परवानगी न घेता ड्रोन उडवल्याप्रकरणी छायाचित्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल

मध्य मुंबईतील परळ येथील ‘उमरखडीचा राजा’ गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीत परवानगी न घेता ड्रोन उडवल्याप्रकरणी एका व्यावसायिक छायाचित्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मध्य मुंबईतील परळ येथील ‘उमरखडीचा राजा’ गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीत परवानगी न घेता ड्रोन उडवल्याप्रकरणी एका व्यावसायिक छायाचित्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरून रविवारी मिरवणूक जात असताना ड्रोन उडवण्यात आले होते.

मिरवणुकीच्या ठिकाणी १५ फूट उंचीवर ड्रोन उडविले जात असल्याचे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. ड्रोन वापरावर बंदी घालणारे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही ते उडवले जात होते. खबरदारीचा उपाय म्हणून अशा कृत्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

भोईवाडा पोलीस ठाण्याच्या एका पथकाने फुटपाथवरून ड्रोनचे संचालन करत असलेल्या एका २२ वर्षीय व्यावसायिक छायाचित्रकाराला ताब्यात घेण्यात आले. हा तरुण ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून मुंबईत आला होता. त्याने ड्रोन चालवण्याची परवानगी नसल्याचे कबूल केले.

logo
marathi.freepressjournal.in