भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात घडला.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात घडला. याप्रकरणी शाहबाज निजाम शेख ऊर्फ आदिल या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिवराम प्रभाकर बांगर हे बांगुरनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आहेत. बुधवारी रात्री उशिरा ते महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी गोरेगाव येथील लिंक रोड, स्नेहा बारसमोर वाहतूक विस्कळीत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेव्हा दोन तरुण हाणामारी करत होते. त्यामुळे त्यांनी या दोघांची समजूत काढून त्यांच्यात भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिलने त्यांनाच शिवीगाळ करुन पोलिसांविषशी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानतर त्याने त्यांची कॉलर पकडून मारहाण केली होती. या घटनेनंतर शिवराम बांगर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बळाचा वापर करुन आदिलला चौकशीसाठी आणले. चौकशीत त्याचे नाव शाहबाज शेख ऊर्फ आदिल असल्याचे उघडकीस आले. तो ओशिवरा येथील गावदेवी इमारतीत राहतो. याप्रकरणी शिवराम बांगर यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in